रविवार, १९ मे, २०१३

उन्हाळा


तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा


कडाड कड घनघोर ऊन...


वैशाखाचा निष्ठुर वणवा


वसुंधरेला जाळत होता.....


जिवा-जिवाला छळताछळता


आकाशाला पोळत होता

चांदोबा



लपंडाव खेळत चंद्र अवघडला...
बात प्रितीची करीत...
निशा लोळत पलंगावर पडली
करुनिया 'शुभ्र' चेहरा हलवी चंद्र आपुला  मोहरा

नाना पाटेकर

नानांची अजब लीला

नाना हे रसायन अजबच

कधी कविता ... कधी सुसंवाद ..

कधी रायफल शुटींग .... कधी मस्त  मैफल

वा, बहोत खूब,

 “क्या बात आहे.....दिलखुलास दाद

रोजच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी,

योग्य शब्दांवर जोर .... आशय उत्तम...काळजाचा ठाव

घेणारा प्रतिभावंत नाना पाटेकर