बुधवार, १२ जून, २०१३

" तीन बेगम एक बादशहा

चतुरंग प्रतिष्ठान आयोजित मुक्तसंध्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक १६ जून २०१३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे " तीन बेगम एक बादशहा " हा संगीत कार्यक्रम सादर होणार असून सर्व रसिकाना हार्दिक निमंत्रण आहे. या कार्यक्रमात शमशाद बेगम, मुबारक बेगम, बेगम अख्तर आणि कुंदनलाल सैगल यांनी गायलेली अजरामर गीते  सादर होणार आहेत. संकल्पना आणि निवेदन डॉक्टर नंदकुमार मुलमुले (नांदेड) यांचे असून सरीवर सरी, बाबुल मोरा या लोकप्रिय कार्यक्रमातील गायक विनायक जोशी, आणि अपर्णा हेगडे, रेश्मा कुलकर्णी हि गीते सादर करणार आहेत. गिरीश प्रभू, उदय  चितळे, ऋषीराज साळवी व गौतम नाईक यांची साथ सांगत आहे.चित्रपट सृष्टीच्या शताब्दीच्या निमित्ताने वेगळ्या बाजाच्या सुरेल आवाजाना एक आगळी मानवंदना आहे. सर्वांनी भरभरून दाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे." तीन बेगम एक बादशहा "

रविवार, १९ मे, २०१३

उन्हाळा


तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा


कडाड कड घनघोर ऊन...


वैशाखाचा निष्ठुर वणवा


वसुंधरेला जाळत होता.....


जिवा-जिवाला छळताछळता


आकाशाला पोळत होता

चांदोबा



लपंडाव खेळत चंद्र अवघडला...
बात प्रितीची करीत...
निशा लोळत पलंगावर पडली
करुनिया 'शुभ्र' चेहरा हलवी चंद्र आपुला  मोहरा

नाना पाटेकर

नानांची अजब लीला

नाना हे रसायन अजबच

कधी कविता ... कधी सुसंवाद ..

कधी रायफल शुटींग .... कधी मस्त  मैफल

वा, बहोत खूब,

 “क्या बात आहे.....दिलखुलास दाद

रोजच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी,

योग्य शब्दांवर जोर .... आशय उत्तम...काळजाचा ठाव

घेणारा प्रतिभावंत नाना पाटेकर