गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

कार्यकर्ता



             कार्यकर्ता 

पक्षधर्मी पदार्पण,सर्वस्वाचे समर्पण 
चाळीपासून वाडीपर्यंत, वाडीपासून नाक्यापर्यंत 
राब राब राबायचं, कर्त्यव्य कर्म निभवायचं 
न झाले जरी कौतुक, मिळाले नाही बहुमान 
करावी जरूर अपेक्षा,मनी ठेवावी अभिलाषा 
समान न्याय हक्काची अपेक्षा,
पदरी पडली जरी निराशा (उपेक्षा )
तरी निराशेतून  आशेला जगवायचं,
मनातली खंत झाकायची 
अन आनंदान स्वागत करायचं 
कर्तव्याला नाही चुकायचं 
सर्वस्व ओतून करायचं  नि 
करता करता झिजायचं 
पण झिजण्याचं चीज झालं 
असं कधी नाही म्हणायचं 
जग जिंकण्याची इर्षा मनी 
पण नशिबाने टोला देता क्षणी 
जरी काळजात कळ ठुस ठुसली 
तरी हुंदक्यांना आतच दडवायचं 
चुकल्यास क्षमस्व जरूर म्हणायचं 
सर्वांना सांभाळीत ...... मने राखीत .....
प्रयाण करायचं 
राजकारणाच्या सारीपटावर खेळायचं 
थेंबे थेंबे तळे साचावायचं 
मिळेल त्यात समाधान मानायचं 
मिळाले मिळाले 
असं कधी नाही बोलायचं ..........

आयुष्यभर झेंडे फलक लावण्यात ......... साहेबांच्या मागे मागे फिरण्यात .....   उन वारा पाऊसाची तमा न बाळगता ........ साहेबांचा शब्द खाली न पडू देणारे असंख्य ...... कार्य ---कर ----ते  म्हणजे 
    कार्यकर्ता          केवळ   त्यांच्यासाठीच